माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीचे नवनियुक्त संचालक संजय बाबाराम अवेरे यांचा सत्कार.

Sanjay Babaram Avere, the newly appointed Director of Secondary School Sevak Sahakari Credit Bank, was felicitated.

मंडणगड : प्रतिनिधी l  नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सर्वाधिक मताधिक्य घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगडचे शिक्षक संजय अवेरे निवडून आले. या निमित्ताने मंडणगड तालुका विकास मंडळ F1428, मुंबई संस्थेच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडनगड हायस्कूलच्या वतीने त्यांचा दि. ३ मे रोजी हायस्कूलच्याच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुरुवातीला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील घोसाळकर यांनी प्रास्ताविक केले .या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संतोष मांढरे, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी ,शांताराम बैकर ,राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. शेडगे उपस्थित होते. कार्यक्रमात यावेळी सत्कारमूर्ती संजय अवेरे यांचा संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष रमेश दळवी यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील यांनी सत्कारमूर्ती संजय अवेरे यांचा सत्कार केला तर राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मुख्याध्यापक श्री .शेडगे यांनी श्री अवेरे यांचा सत्कार केला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी यांनी आपल्या मनोगतात लोकशाही आघाडी पॅनल बहुमताने अर्थात सर्वांच्या मताने निवडून आले आहे. नवनियुक्त संचालकांच्या वतीने पतपेढीच्या सदस्यांप्रती सर्वोत्कृष्ट कामगिरी अपेक्षित आहे, या कामगिरीचे श्रेय संस्थेलाही मिळणार आहे. त्यामुळे संचालकांच्या जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन करत नानियुक्त संचाकाना शुभेच्छा दिल्या. राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संतोष मांढरे यांनीही यावेळी नवनियुक्त संचालक श्री. अवेरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मागील पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर लोकशाही पॅनल निवडून आले आहे. गेली 35 वर्ष पतसंस्था कार्यरत आहे. त्यामध्ये टीडीएफ, कास्ट्राईब, शिक्षकेतर कर्मचारी, उर्दू शिक्षक संघटना या एकत्रित लढल्याने हे यश मिळाले आहे, हा लोकशाही आघाडी पॅनलच्या सर्व सदस्यांचा विजय असल्याचे हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक सुनील घोसाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शिक्षक प्रभाकर भालके, प्रमोद बिराजदार, श्री. याच्यावाड , शिक्षका योजना शेट्टी, सचिन दहिभाते, आटपाडकर मॅडम ,क्रीडा शिक्षक मनोज चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी श्री. गोरड यांनी आपले मत व्यक्त करून उमेदवारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे परीक्षक शांताराम बैकर यांनी नवनियुक्त संचालक श्री. अवेरे सर हे निश्चित चांगले काम करतील अशी ग्वाही दिली. उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी सर यांनी हा विजय आपणा सर्वांचा आहे .सत्याचा आहे. यापुढे सत्यानेच काम करावे असेही सांगितले.

आपल्या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त संचालक संजय अवेरे यांनी आपणा सर्वाना अभिप्रेत असलेली व सर्वांप्रती न्याय्य असलेली सर्वोत्तम कामगिरी माझ्याकडून होईल असा आशावाद यावेळी व्यक्त केला.

फोटो – रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी संस्थेच्या नवनियुक्त संचालक संजय अवेरे यांचा सत्कार करताना मंडणगड तालुका विकास मंडळ F1428, मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी, राजीव गांधी इंग्लिश स्कूलचे चेअरमन संतोष मांढरे, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील व मान्यवर.