आ.नितेश राणे यांच्या शिरगाव येथील प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद 

 

 

शिरगाव ( प्रतिनिधी) शिरगाव येथे बुधवारी आठवडा बाजार असल्यामुळे आ.नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शिरगाव बाजारपेठेत ‘ आ. नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है’.’भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा देत प्रचार फेरी काढली.त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड मंडल अध्यक्ष राजेंद्र शेट्ये ,भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम, मंगेश लोके,संतोष कुमार फाटक, सुभाष नार्वेकर, महेश पाटोळे,सदानंद देसाई, अजित कांबळे,शैलेंद्र जाधव, सत्यवान सावंत, किशोर साळसकर, महेंद्र परब,सुभाष कदम,पप्पू घाडी,सुहास परब, सुनील कांडर,आबा रुमडे,महेश पवार, हडपीड सरपंच संध्या राणे,गा.प सदस्य स्वाती साटम, शितल तावडे,धनश्री नाईक, अपुर्वा तावडे ,तसेच शिरगाव पंचक्रोशीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.