सहकुटुंब मतदान केंद्रावर जात केले मतदान
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर जात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडीच्या माजी माजी उपनगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर तसेच जावई व नातू उपस्थित होते. मतदारांनी घराबाहेर पडून निर्भीडपणे मतदान करावे. कोणत्याही आमिषांना बळी पडू नये. विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.












