त्रिंबक येथे 23रोजी निबंध स्पर्धा बक्षिस वितरण

आचरा-अर्जुन बापर्डेकर : दत्ता पवार तसेच भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत मातोश्री शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण गुरुवार २३जानेवारी रोजी ५ .३०वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, सम्राट अशोक नगर त्रिंबक येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर,माजी उपसभापती अशोक बागवे, जनता विद्यामंदिर त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर,सिंपन प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष अनिल तांबे यांच्या सह अन्य मान्यवर आदी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.