खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील बहिरवली-भागणेवाडी येथील शिवशक्ती बाल मित्र मंडळातर्फे २६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ यावेळेत सोमेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देवून
गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी गणपत भागणे, महेश भागणे, नरेंद्र भागणे, विलास भागणे, सखाराम भागणे, बबन आडविलकर, गणपत भागणे, रामचंद्र धावडे, दादू भागणे, पांडुरंग भागणे, अनिल भागणे, सुरेश भागणे, प्रकाश भागणे, प्रकाश का. भागणे, नामदेव भागणे, पांडुरंग भागणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.









