Small farmers should get loan waiver and incentives
फोंडाघाटचे सोसायटी चेअरमन राजन नानचे यांनी आमदार नितेश राणे यांचे कडे केली मागणी
कणकवली | प्रतिनिधी : अल्प भुधारक शेतकऱ्यांना खावटी पुरक कर्जमाफी व नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या अल्प भुधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळावा अशी मागणी फोंडाघाट वि. कास. सेवा सोसायटी फोंडाघाटचे चेअरमन
राजन नानचे यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांचे कडे केली आहे. कणकवली ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन तशा मागणीचे निवेदन राजन नांचे यांनी आमदार राणे यांना दिले.
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना जाहीर केलेली होती. मात्र सदर योजनेमध्ये खावटी पुरक शेती कर्जाचा समावेश केलेला नसल्यामुळे बरेचशे शेतकरी दर वर्षी कर्ज घेवुन मुदती मध्ये परतफेड करणारे, अल्प भुधारक शेतकरी सदर योजनेपासुन वंचित राहिलेले आहेत.तसेच त्यानंतर सदर योजनेमध्ये अल्प भुधारक शेतकरीऱ्यांना संस्थानी वाटप केलेल्या खावटीपुरक कर्जाचा समावेश करुन लाभ देणेसाठी केंद्रिय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे याचे प्रयत्नातुन शासन दरबारी निर्णय घेणेत आला होता. मात्र त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नव्हती मात्र आता सदर निर्णयाची अंमलबजावणी होणार असलेचे समजते. तरि आमच्या फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटी लि. फोंडाघाट या संस्थेच्या अकुण १८७ पात्र कर्जदारांपैकी फक्त ४ थकबाकीदार कर्जदार सभासदाना ९३८४९ एवढा लाभ मिळणार असुन १८३ पात्र कर्जदार नियमित कर्ज फेड करणारे असुन सदर अल्प भुधारक शेतकरी प्रोत्साहन रक्कम किमान रु २००००/ प्रति शेतकरी याप्रमाणे रु. ३६६०,००० अवढी प्रोत्साहन रक्कम मिळणेस पात्र आहेत. तरि या शेतकऱ्यांना खावटी कर्ज माफी देते वेळी थकीत कर्जदाराबरोबर नियमित कर्जाची परत फेड करणाऱ्या कर्जदारांना प्रोत्साहन रक्कम मिळवुन देणे करिता आपल्या मार्फत प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली आहे.












