चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात साईशा लाडगावकर व कुमार गटात विनीत रावले व विघ्नेश सावंत प्रथम

Saisha Ladgaonkar and Kumar group Vineet Rawle and Vignesh Sawant first in painting and handwriting competition.

शिरगाव (वार्ताहर) देवगड तालुक्यातील साळशी सरमळेवाडी येथे घेण्यात आलेल्या चिञकला व हस्ताक्षर स्पर्धेत साईशा लाडगावकर व कुमार गटात विनीत रावले व विघ्नेश सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला .
सुखशांती मंडळ साळशी – सरमळेवाडी व ग्रामस्थांंच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने मुक्तांगण या कार्यक्रमांतर्गत मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या
यावेळी चिञकला स्पर्धेत बालगटात साईशा लाडगावकर प्रथम क्रमांक, सामवेद लाड व स्वराज राणे द्वितीय क्रमांक ( विभागून),सेजल रावले व स्वरा रासम तृतीय क्रमांक (विभागून) देण्यात आला.कुमार गटात विनीत रावले प्रथम क्रमांक, प्रिंन्स बोडवे द्वितीय क्रमांक, विघ्नेश सावंत तृतीय क्रमांक मिळाला
हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात साईशा लाडगावकर प्रथम क्रमांक, सामवेद लाड द्वितीय क्रमांक, सेजल रावले तृतीय क्रमांक मिळाला.तर कुमार गटात विघ्नेश सावंत प्रथम क्रमांक, पालवी सावंत व रीची सावंत द्वितीय क्रमांक ( विभागून) देण्यात आला.प्रिन्स बोडवे व विनित रावले तृतीय क्रमांक ( विभागून) देण्यात आला.
सर्व विजेत्याना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
तसेच महिलांसाठी हळदी कुंकू,व संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला.संगीत खुर्ची स्पर्धेत सौ. मीरा मयुर सावंत, तन्वी पुरुषोत्तम सावंत यांचा प्रथम क्रमांक आला त्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले
रात्री आई भगवती कला दिंडी तोरसोळे यांचे वारकरी दिंडी भजनाचा कार्यक्रम झाला
या सर्व कार्यक्रमास सुखशांती मंडळीचे सर्व आजी माजी पदाधिकारी,ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
फोटो कॅप्शन: साळशी- सरमळे वाडी येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले ( छाया:राजू साटम शिरगाव )