आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह महायुती सरकारचे केले अभिनंदन
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्रात मागील नऊ महिन्यात १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक महायुती सरकारने खेचून आणली आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीच्या परकीय गुंतवणुकीच्या डिसेंबर २०२४ अखेरच्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात खेचून आणल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारचे आमदार निलेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.












