खेड – दापोली मार्गावरील दुचाकी अपघातात पती-पत्नी जखमी

खेड ((प्रतिनिधी) खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात पती-पत्नी जखमी झाले.

समीक्षा सुरेश सुतार (३५), सुरेश चंद्रकांत सुतार (३८ दोघे राहणार कळंबणी) अशी जखमींची नावे आहेत. दापोली दिशेकडून अॅक्टिव्हा दुचाकीने पत्नीसह येणारे सुरेश सुतार यांना समोरून येणाऱ्या एसटी बसचालकाने हूल दिल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. जखमींना सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी रुग्णवाहिकेने तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.