मोफत कायदेशीर मदत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण
*जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, सुटसुटीत भाषेत माहिती दिली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर मदत कोणाला मिळण्याचा अधिकार आहे आणि त्यांचा संपर्क याबाबत आज या लेखातून आपण माहिती घेणार आहोत.*
Access to Justice for all न्याय सब के लिये या न्याय तत्वानुसार मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव उपलब्ध आहेत. 15100 हा टोल फ्री क्रमांक आहे.
*मोफत कायदेशीर मदत-* महिला, अनुसूचित किंवा अनुसूचित जन जमातीचा सदस्य आपत्ती, जातीय हिंसाचार, अत्याचार, आपत्ती, बळी, औद्योगिक कर्मचारी ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, कैदी, तस्करीचा बळी, अपंग व्यक्ती, लहान बालके या सर्वांना मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार आहे. कायदेशीर सहाय्य लाभार्थ्यांना कोणताही कायदेशीर खर्च किंवा वकील फी भरावी लागणार नाही. हे पूर्णपणे कायदेशीर किंवा संस्थाद्वारे संरक्षित आहेत.
*संपर्क-* nalsa.gov.in, यू ट्यूब-NALSA, X-@NALSALegalAid, Insta-nalsalegalaid, Facebook-nalsa.india.1, E-mail-nalsa-dla@nic.in ही राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाविषयी माहिती घेण्याबाबत संपर्काची समाजमाध्यमे आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी, खोली क्र. १६, तळमजला, जिल्हा न्यायालय इमारत, खारेघाट रोड, दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२४७६८, भ्रमणध्वनी ८५९१९०३६०८ ई-मेल mahratdlsa@bhc.gov.in यावर संपर्क साधावा.
*- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*











