मुद्देमालासह चारजण ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
सावंतवाडी : कोलगांव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. पैसे लावून अंदर बाहर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून ९२०० रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. तर याप्रकरणी राजन गणपत देसाई ( माठेवाडा, सावंतवाडी ), सुरेश रघुनाथ नार्वेकर ( सर्वोदय नगर ), मनोज प्रभाकर नाईक ( कोलगांव, चव्हाटावाडी ) व संतोष सहदेव राणे ( लाडाची बाग ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पालकर आदींनी ही कारवाई केली.












