रिक्षा व्यवसायिकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार

स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पूर्वीपासूनच्या मागणीला अखेर यश

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीमध्ये “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जनतेच्या हिताच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली.

तसेच कारखानदारी काम करणारे,शेती व्यवसायिक,इतर वाहने,मत्स्य, आंबा इतर कृषी उत्पादने करणारा वर्ग शासन दर्जा प्राप्त करतो.त्यांना त्या त्या अनुषंगाने शासकीय सवलती आहेत.मात्र रिक्षा व्यवसायिकाला काहीच संबोधन नसल्याने त्याला श्रममूल्य निधी, निर्धारित शासन दर्जाच्या योजना आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी रिक्षा व्यवसायिकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावे अशी रिक्षा व्यवसायिकांची पूर्वीपासूनची मागणी होती.

स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर यांच्या समवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन आघाडी सरकार मधील उद्योगमंत्री नारायणराव राणे यांची भेट घेऊन रिक्षा व्यवसायिकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावे अशी पत्राद्वारे मागणी केली होती.पूर्वीपासूनची प्रलंबित असलेली ही मागणी शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली असून पुढील दोन महिन्यात याची अंमलबजावणी केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.

सरकारच्या या निर्णयाने रिक्षा व्यसवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत,माजी खासदार निलेश राणे, स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष,आमदार नितेश राणे, जेष्ठ पत्रकार बाबा ढोल्ये या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.