Students of DAIDAS DANCE STUDIO created history by becoming national gold medalists seven times in a row.
चिपळूण: दिनांक 20 मे 2023 रोजी गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेमध्ये चिपळूण मधील सुप्रसिद्ध डायडाज डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी सल्लग् सात वेळा राष्ट्रीय सुवर्णपदकाचे मानकरी ठरत रचला इतिहास, आठ वर्षाखालील सोलो मधील सिया शिर्के सुवर्णपदक तर आधिरा लाड कास्यपदक, आठ ते अकरा वर्ष गटामध्ये रेहांशी दांडेकर रौप्य पदक तर माहेश्वरी भुवड कास्यपदक 14 वर्षाखालील गटांमध्ये स्वरांजली निमकर सुवर्णपदक तसेच आदिती खेराडे रौप्य पदक व पंधरा वर्षावरील मुलींमध्ये अंतरा गोरीवले कास्यपदक व 14 वर्षाखालील मुलांमध्ये साद शेख रौप्य पदक व कार्तिक मठपती कास्यपदक इतकेच नव्हे तर 14 वर्षाखालील ट्रायो मध्ये महेश्वरी भुवड, साची पाटील ,शर्वरी सैतावडेकर सुवर्णपदक. सुपर मॉम कॅटेगिरी मध्ये ओजस्वी सावंतदेसाई रोप्य पदक तसेच असता कांबळे ,साची पाटील ,आईना छाब्रा ,आहाना पवार, राधा मोहिते ,याही विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता.
वरील सर्व विजेते स्पर्धकांना व तसेच सहभागी विद्यार्थ्यांना गोवा राज्य टुरिझम चे मंत्री श्री रोहन खउंटे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व त्यांचे कौतुक केले तसेच राष्ट्रीय परफॉर्मिंग आर्ट्स चे जनरल सेक्रेटरी श्री रजनीकांत ठाकूर सर व गोवा असोसिएशनचे सेक्रेटरी श्री सुदेश सलगावकर सर व महाराष्ट्र राज्य परफॉर्मिंग आर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व डायडाज डान्स स्टुडिओ चे संचालक श्री सुरज जाधव यांनी या सर्व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना जून मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आले असून हे विद्यार्थी नेपाळ व व्हिएतनाम येथे भारताचे नेतृत्व करणार आहेत.












