खेड(प्रतिनिधी) नवसाला पावणारी तसेच हाकेला धावणारी तालुक्यातील मिर्ले तांबड येथील श्री झोलाईमाता जागृत देवस्थान चा ४ ते ६ मे, २०२५ रोजी त्रैवार्षिक जत्रोत्सव सोहळा उदयोजक श्री. जगन्नाथराव मोरे आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखात संपन्न झाला. या उत्सवात लाट फिरवणे हा धार्मिक कार्यक्रम आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरला
या सोहळयात पंचकोशीतील गावोगावच्या पालख्यांचे नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्याचे स्वागत व पुजन करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांचा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळयात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. श्रीझोलाईमाता मंदिर जिर्णोध्दारासाठी भाविकांनी आणि माहेरवाशीनी भगिनीकडून भरघोस प्रतिसाद मिळाला याबद्दल मिर्ले तांबड ग्रामस्थ मंडळचे सरचिटणीस श्री. रविंद्र पांडुरंगराव भोसले यांनी मानले












