कोकण विभागातील वजन माप उत्पादक दुरुस्तक व विक्रेते यांचे ०३ जून रोजी पनवेल येथे स्नेहसंमेलन व कार्यशाळेचे आयोजन 

लांजा (प्रतिनिधी) कोकण विभागातील वजन माप उत्पादक दुरुस्तक व विक्रेते यांचे स्नेहसंमेलन व कार्यशाळा ३ जुन रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे.

वेट्स अँड मेजर लाईसनसी वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र( शासनमान्य वजने मापे उत्पादक विक्रेते व दुरुस्तक परवानाधारकांची संघटना, महाराष्ट्र यांचे वतीने ०३जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत संस्मरण बेंकट हॉल , निल एन्क्लेव्ह, खांदा कॉलनी, पनवेल, जिल्हा रायगड. येथे ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे.

या स्नेहसंमेलना निमित्त व कार्यशाळेनिमित्त कोकण विभागातील ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वजन माप परवानाधारक उपस्थित राहणार आहेत .तसेच महाराष्ट्रातील संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमात (कार्यशाळेत) महाराष्ट्र शासनाचा वैधमापन शास्त्र विभाग सहभागी होणार आहे.

या कार्यक्रमाला शिवाजी काकडे, सहनियंत्रक वैध मापनशास्त्र , कोकण विभाग हे प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून कार्यशाळेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपनियंत्रक हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या व वैधमापन शास्त्र विभागाच्या धोरणा विषयी, व्यवसाय सुलभता , ऑनलाइन कार्यप्रणाली तसेच वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ व महाराष्ट्र वैध मापनशास्त्र अंमलबजावणी नियम २०११ याविषयी परवानाधारकांना

या कार्यक्रमात मार्गदर्शन होणार आहे. कोकण विभागात या क्षेत्रातील व्यवसायिकांसाठी असा उपक्रम पहिल्यांदाच होत आहे. वजन माप व्यावसायिकांमध्ये आपसातील संवाद व चर्चा तर होणार आहे पण सोबतच परवानाधारकांना आपल्या मनातील शंका अडचणी याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे . महाराष्ट्रात या क्षेत्रात अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे .संघटनेचा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न हाच आहे की शासन यंत्रणा वजन माप व्यवसायिक यांच्यात समन्वय साधून व्यवसाय सुलभ वातावरण कोकणात तयार करणे.

तरी या कार्यक्रमाचा कोकणातील वजन माप परवानाधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने संतोष व्यवहारे , संघटना सहसचिव , व समन्वयक कोकण विभागीय स्नेहसंमेलन व कार्यशाळा) यांनी केले आहे.