अभिनेता ओंकार भोजने, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती,
चिपळूण (प्रतिनिधी):– जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून चिपळूण नगर परिषदेच्यावतीने जलतरण तलाव ते व्ह्यू गॅलरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले. अभिनेता ओंकार भोजने, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सकाळी नऊ वाजता या वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर पालिकेने वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले. शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर झाडे लावली जाणार आहेत. जलतरण तलाव येथील रस्त्यावर बकुळीचे झाडे लावण्यात आली आहे. अन्य रस्त्यांवर एकाच प्रकारचे झाडे लावली जातील व ज्या प्रकारची झाडे लावली जातील, त्या झाडांचे नाव त्या रस्त्याला दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी वृक्षारोपण करताना या उपक्रमाचे कौतुक केलं. तसेच वृक्षारोपणासह पर्यावरण रक्षणासाठीच्या उपक्रमांसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले.
अभिनेता ओंकार भोजने यांनी वृक्षारोपण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, केवळ वृक्ष लागवड करून उपयोग नाही, तर त्याचे जतनही केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगर पालिकेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, जलदूत शहानवाज शहा, नाम फाउंडेशनचे समीर जानवरकर, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज, विश्वास पाटील, आदिती देशपांडे, रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर, नगर पालिकेचे उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर कार्यालयीन अधिक्षक रोहित खाडे आरोग्य निरिक्षक सुजित जाधव आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते नगर अभियंता दिपक निबांळकर , अग्नीशमन अधिकारी आनंद बामणे अकौंटन शिल्पा शेटे अविनाश बेंद्रे नागरी केंद्र प्रमुख वलींद वांगडे संगणक विभाग प्रमुख निवेदिता आंबेकर विघुत अभियंता संगिता तांबोळे वाहन विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी केले होते.











