जि. प.शाळा तळवली नं.3 आगरवाडी शाळेत नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप

गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील जि. प.शाळा तळवली नं.3 आगरवाडी शाळेत नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्याध्यापक श्री जानवळकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील खोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक नवीन वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थीवर्गाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला उपशिक्षिका सौ.कांबळे,पालक किरण आगरे,अपूर्वा केतकर,तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.