महसुल व बंदर विभागाची अनधिकृत वाळू व्यवसायाला साथ आहे का ?

त्या धरसोड कारवाई वरून भाजप देवली शक्तीकेंद्र प्रमुख विरेश मांजरेकर यांनी उपस्थित केला सवाल

मालवण | प्रतिनिधी : पर्यटन व मासेमारी होड्यांवर बंदी कालावधीची कडक अंमलबजावणी करणारा बंदर विभाग अनधिकृत वाळू व्यवसायाला अभय देतो की काय ? तसेच यासर्वात महसूल विभागाच्या काही कर्मचारी यांची साथ आहे का ? असा संतप्त सवाल भाजप देवली शक्तीकेंद्र प्रमुख विरेश मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे.

 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, देवली खाडीपात्रात पुलानाजीक अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने वाळू उत्खनन होते. याबाबत महसूल व बंदर विभागाचे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

 

देवली येथे दोन दिवसांपूर्वी रात्री एक वाळू उपसा करत असलेली होडी महसूल व बंदर विभागाने पकडली. अशी चर्चा गावात सुरू आहे. मात्र वाळू भरणा असलेली होडी नाममात्र दंड आकारणी दाखवून सोडून देण्यात आली. अशी चर्चा आहे.

 

वाळू उत्खननास कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननास अश्या पद्धतीने प्रशासन साथ देत असेल तर हा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्रं पिठ खाताय असाच म्हणावा लागेल. यात आर्थिक व्यवहार होत आहेत का ? असाही सवाल उपस्थित होत आहेत.

 

तरी या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हावी. बंदर व महसूल विभागाचे कोण कर्मचारी या कारवाईत होते का ? त्यांचीही चौकशी व्हावी. याबाबत तहसीलदार यांचेही आम्ही लक्ष वेधणार असून जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे विरेश मांजरेकर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.