मालवण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती 

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची बदली झाल्या नंतर पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.

 

कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून मारुती जगताप यांची ओळख आहे. 2009 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून अमरावती येथून त्यांची पोलीस दलातील सेवा सुरु झाली. त्यानंतर एपीआय म्हणून त्यांना बढती मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, ओरोस तसेच कोल्हापूर याठिकाणी त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर 2021 साली पोलीस निरीक्षक पदी त्यांची बढती झाली. रत्नागिरी येथे त्यांनी 2024 पर्यत सेवा बजावली. नंतर ठाणे ग्रामीण शहापूर पोलीस ठाणे व त्यानंतर जुलै 2024 पासून कणकवली पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. आता मालवण पोलीस ठाणे येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.