चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील विविध तलावापैकी वीरेश्वर तलाव वीरेश्वर मित्र मंडळाने २००६ सालात ४३ लाख खासदार निधीतून सुशोभीकरण केला. त्यानंतर गेल्यावर्षी नारायण तलाव कोट्यावधी रुपये खर्च सुशोभित करण्यात आला. दररोज नारायण तलावाची निगा नगर परिषदेकडून राखली जाते, परंतु वीरेश्वर तलावाकडे मात्र योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही. फक्त रोज चालण्याची जागा साफसफाई करण्याव्यतिरिक्त काहीही काम होत नाही. तलावा सभोवती प्रचंड झाडी वाढली आहे, चालण्याच्या मार्गावर शेवाळ झाले आहे. नगर परिषदेने यापुढील काळात नारायण तलावाप्रमाणे वीरेश्वर तलावाची निगा व साफसफाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे.













