दापोली तालुक्यातील 106 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; काहींना दिलासा, काहींना निराशा

दापोली (प्रतिनिधी – राकेश कोळी):
दापोली तालुक्यातील एकूण 106 ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. ही प्रक्रिया कोकण कृषी विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात, तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही इच्छुकांना अपेक्षित संधी मिळाल्याने समाधान व्यक्त होत असले तरी, अनेकांना यावेळी संधी न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटले.

आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे:

सर्वसाधारण (Open): 34 ग्रामपंचायती

सर्वसाधारण (महिला): 34 ग्रामपंचायती

अनुसूचित जमाती (ST): 6 ग्रामपंचायती

अनुसूचित जाती (महिला – SC): 3 ग्रामपंचायती

ओबीसी (Open): 15 ग्रामपंचायती

ओबीसी (महिला): 14 ग्रामपंचायती

महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचे आरक्षण:

SC (महिला): विसापूर, शिर्दे, नाटे

ST (महिला): पिसई, मुगीज, माटवण

OBC (महिला): पांग, करजगांव, कवडोली, कादिवली, टांगर, नवशी, भोमडी, शिरसाडी, साखळोली, आडे, आंबवली बु., उंबर्ले, गव्हे, पालगड

OBC (Open): आपटी, पन्हाळेकाझी, फणसू, भोपण, हातिप, देगाव, गिम्हवणे, तेरेवायंगणी, मौजे दापोली, भडवळे, साकुर्डे, विरसई

सर्वसाधारण (महिला): अडखळ, आसूद, कोळथरे, शिरवणे, पाडले, गावतळे, टेटवली, नवसे, वेळवी, केळशी, हर्णे, चिखलगाव, कुडावळे, आगरवायंगणी

सर्वसाधारण (Open): दाभोळ, आंजर्ले, असोंड, इळणे, पाचवली, सोंडेघर, मांदिवली, मुरुड, कोंगळे, लाडघर, करंजाणी, शिवाजीनगर (सा.), चंद्रनगर, पंचनदी

प्रशासनाकडून या आरक्षण प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचे आणि सामाजिक न्यायाचा विचार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सरपंच निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने आगामी काळात ग्रामपंचायतीतील राजकीय चित्र अधिकच रंगतदार होणार आहे.