आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे शिक्षण राज्य मंत्री डॉ पंकज भोयर याना निवेदन
गौरव पोंक्षे l माखजन : १५ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यातील शाळांचे संच मान्यता निकष,आदेश रद्द व्हावा यासाठी यासाठी अनेक संघटना कोर्टात गेलेल्या आहेत.सदर प्रकरण ज्ञाय प्रविष्ठ असताना देखील शिक्षण संचालक पुणे यांनी शालार्थ पोर्टल मध्ये पोस्ट मॅपिंग करण्याचे आदेश काढले आहेत.ज्ञाय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणावर कोर्टाकडून निर्णय आल्यावरच पुढील कार्यवाही होणे अपेक्षित आहे.तरी शिक्षण संचालक पुणे यांनी काढलेले आदेश तात्काळ थांबवण्यात यावेत यासाठी कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर याना निवेदन दिले आहे.













