रत्नागिरी : कालपासून सुरू झालेल्या पावसांत पहिल्याच दिवशी घरावर वीज कोसळून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील सत्कोंडी गावात घडली
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक २४ जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास सत्कोंडी गावात हुमणेवाडी येथील दिप्ती नितीन काताळे यांच्या घरावर वीज कोसळली, घराच्या कौलांचा चक्काचूर करत वीज घरात घुसली आणि श्रीमती दिप्ती यांना जोरदार धक्का बसला यात त्यांच्या अंगात कौलांचे तुकडे घुसले आणि दोन्ही कानांना जबर दुखापत झाली.
*वाटद आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
*वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा रितसर पंचनामा महसूल विभागाने केला असून दिप्ती काताळे व त्यांच्या शेजारी सरस्वती हुमणे या़ंच्या घरातील वीजेची जोडणी, बोर्ड, विविध उपकरणे, व घरांची पडझड अशी लाखोंचे नुकसान झाले आहे.











