स्वच्छ आणि सुजल ग्रामविकासासाठी ‘सरपंच संवाद’ मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा प्रभावी वापर करा

जिल्हा परिषद रत्नागिरीचा आवाहन

रत्नागिरी –
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन या दोन्ही केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “सरपंच संवाद” हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे ग्रामपंचायतींना पाणी व स्वच्छता योजनांबाबत अधिक प्रभावी नियोजन करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जलस्वच्छता मिशन कक्षाने दिली आहे.

या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्यांना उपयुक्त ठरणार असून, यातून गावपातळीवर संवाद साधता येणार आहे. अ‍ॅपमुळे ग्रामपंचायतींना विविध प्रशिक्षण, शंका निरसन, यशोगाथा आणि योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.

२२ जुलैपासून उपलब्ध

स्वच्छ व सुजल ग्रामविकासासाठी सरपंच संवाद अ‍ॅप २२ जुलै २०२५ पासून अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस प्रणालींवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाले आहे. अ‍ॅपमध्ये क्विझ, संवाद, यशोगाथा, ऑनलाईन प्रशिक्षण, वॉइस मॅसेजेस, ग्राफिक्स आदी अनेक माध्यमातून माहिती दिली जाते.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व संबंधितांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे