पोलीस बांधवांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांनी बांधली राखी

रत्नागिरी: आज, ९ ऑगस्ट २०२५ रोजी, रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात आला. या वेळी महिलांनी पोलीस बांधवांना राख्या बांधून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष पल्लवीताई पाटील यांच्यासह प्राजक्ता रूमडे, संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, शोनाली आंबेरकर, सायली बेर्डे, निशा अलीम आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या महिलांनी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.