निगुडे माऊली मंदिरात मंगळवार पासून हरीनाम सप्ताह सोहळा

बांदा l प्रतिनिधी :निगुडे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार १९ व बुधवार २० ऑगस्ट रोजी दोन दिवसीय वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होत आहे. मंगळवार १९ रोजी दुपारी १२ वाजता हरीनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ होईल.

 

यावेळी इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली, रोणापाल, मडूरे, निगुडे गावातील ग्रामस्थांची भजने सादर होतील. बुधवारी दुपारी १२ वा. नंतर दिंडी आरती होऊन सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान समिती निगुडे, मानकरी व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.