वेंगुर्ले l प्रतिनिधी :देशाच्या सीमा रक्षणासाठी, राष्ट्राच्या सन्मानासाठी आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या १८ निवृत्त सैनिकांना वेंगुर्ले येथे मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्लेत “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत हा निवृत्त सैनिक सन्मान समारंभ बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे देशभक्तीच्या उत्साहात संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यात माजी सैनिक समीर प्रभूखानोलकर, आनंद गावडे, संतोष चेंदवणकर, देवेंद्र लक्ष्मण गावडे, पुंडलिक द्वारकानाथ धरणे, प्रताप शिवराम राणे, विलास वासुदेव राणे, विक्रांत सुहास चुडजी, भगीरथ गोपाळ बागायतकर, के. दत्तराम गावडे, सुभाषचंद्र परब, संतोष राणे, दिवाकर धुरी, जॅक डिसोझा व श्रीकांत कावले यांचा सन्मान झाला.
कार्यक्रमाला बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे प्राचार्य डॉ. बी. गोस्वामी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा उद्योग आघाडी जिल्हा संयोजक सुधीर झाट्ये, शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष विष्णु परब, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सुहास गवडळकर, महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, आकांशा परब, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, सुरेंद्र चव्हाण
आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी माजी सैनिकांचे योगदान हा देशाचा अमूल्य ठेवा असल्याचे सांगून, तरुणांनीही देशसेवेची प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सचिन परुळकर यांनी केले. यावेळी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.













