माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टिका
मालवण | प्रतिनिधी : जनतेच्या मोठया पाठिंब्याने राज्यात सत्तेत आलेल्या आमच्या भाजपा महायुतीची गाडी सुसाट आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाला अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. मालवणातही अस्तित्व हीन झालेला उबाठा व विरोधी पक्ष केवळ अकलेचे तारे तोडण्याचे काम करतं आहे. स्मार्ट मिटर बाबतही स्टंटबाजी करण्याचे प्रकार सुरु आहेत. उबाठासह विरोधी पक्षाच्या हातून काहीच होणार नाही हे जनतेला माहित असल्याने जनता भाजपा महायुती सोबत ठामपणे उभी आहे. अशी भुमिका मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्पष्ट केली.
आम्ही अनेक वर्षे जनतेचे सेवक म्हणूनच काम करतो. त्यामुळे वीज वितरण व अन्य शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी दिरंगाई करून चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य पद्धतीने जाब विचारणे, जे जनतेच्या हिताचे आहे तेच होण्यासाठी प्रयत्नाशील राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. हीच शिकवण आम्हाला आमचे दैवत लोकनेते नारायण राणे साहेबांनी दिली आहे. सोबतच आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचेही आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते. त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणे व त्यांना न्याय मिळवून देणे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.
त्यामुळे विरोधकांनी स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करावी.
अज्ञानी कोण आहेत यांचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ खरोखर विरोधकांवर आली आहे.
आम्ही जनहितासाठी व लोककल्याणासाठी सदैव तत्पर असणारे लोकप्रतिनिधी आहोत. तसेच आम्ही भारतीय जनता पक्षाचा व महायुतीचा सन्मान करणारे आहोत. जनहित हे आमच्या रक्तात आहे. असे सांगत सुदेश आचरेकर यांनी उबाठा व विरोधकांवर टिका केली.









