त्रिंबक हायस्कुलच्या माजी विध्यार्थ्यांकडून 52 हजारांची मदत!

मसुरे | झुंजार पेडणेकर :                                 जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या 1976 सालच्या दहावीच्या बॅचच्या माजी विध्यार्थ्यां कडून प्रशालेची गरज ओळखून 52 हजार रुपयांची मदत करण्यात आली. प्रशालेच्या मुलींचे शौचालय नादुरुस्त असल्याने या शौचालयाची दुरुस्ती तसेच सीसीटीव्ही लावण्याचे काम या रकमेतून करण्यात आले. आर्थिक मदती बद्दल मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी माजी विध्यार्थी प्रफुल्ल प्रभू, सिताराम बागवे, अशोक पेंडूरकर, श्रीकांत जाधव, विजय पाटील, सौ शामल पाताडे,अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, श्री गायकवाड आदी उपस्थित होते.