रत्नागिरी :
भाजपचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती आणि निष्ठावान पक्षनेते विजयराव सालीम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही मदत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आली असून, सालीम यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिच्या पुढील शिक्षणासाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे.
गेल्या वर्षी अल्पशा आजाराने विजयराव सालीम यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी पक्षासाठी आयुष्यभर मेहनत घेतली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी जाणून संवेदनशीलता दाखवत आ. रवींद्र चव्हाण यांनी ज्ञानेश्वरीच्या शिक्षणासाठी तिच्या नावावर ५ लाख रुपयांची मुदत ठेव (FD) करून दिली. या ठेवीवर दरवर्षी सुमारे ५२,०००/- रुपयांचे व्याज मिळणार असून, हे व्याज तिच्या शिक्षणासाठी वापरता येईल.
ही एफडी स्लिप भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते सालीम कुटुंबाला प्रदान करण्यात आली.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, सरचिटणीस उमेश देसाई, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, ग्रामपंचायत सदस्या आर्या सावंत, तसेच अमोल सावंत, ययाति शिवलकर, दीपक पाटील, विजय सावंत, स्वरूप सावंत आणि सालीम कुटुंबीय उपस्थित होते.
भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रती असलेल्या आपुलकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा हा प्रत्यय आहे.












