वालावलकर मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

वालावलकर मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त भ.क.ल. वालावलकर रूरल मेडिकल कॉलेजमध्ये नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. डॉ. शशिकांत धुमाळे प्राध्यापक त्वचारोग यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी, इंदुमती फाऊंडेशन संस्थेतर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार केला.
वालावलकर रुग्णालय आणि रोग निदान केंद्र ही सेवाभावी संस्था असून त्यांचे दातृत्व वाखाणण्याजोगे आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेकांचे कल्याण होत आहे. अनेक गोरगरीब रुग्णांनवर मोफत व अल्प दरात उपचार होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडत आहेत. इतर संस्थामध्ये साठीनंतर तुम्हाला सेवानिवृत्त केले जाते अथवा कमी पगारात नोकरी करावी लागते. पण इकडे असे न करता सगळ्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. संस्था आपले सर्व उत्पन्न शिक्षक वर्ग, विद्यार्थी व सामाजिक काम यासाठी खर्च करते, ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे, असे प्रा. धुमाळे यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सुवर्णा पाटील, डॉ.अरविंद यादव, डॉ. अनघा मोडक, डॉ. चेतन जावसेन, डॉ. गजानन वेल्हाळ, डॉ. आनंद गजकोष, डॉ. प्रतीक शहाणे, डॉ. राजीव केणी, डॉ. प्रशांत मूल्या यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
फोटो फाईल- सीपीएन९-८
डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. शशिकांत धुमाळे आणि इंदुमती फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉ.अरविंद यादव व अन्य मान्यव