शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता हरपला
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील रामपूर बौध्दवाडी येथील आणि एस टी आगर चिपळूण येथील सेवानिवृत्त कर्मचारी कालकथित चंद्रमणी पांडुरंग जाधव यांचे दिनांक ५ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता आकास्मिक अपघाती निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
शिव फुले शाहू आंबेकर चळवळीतील तन मन झोकून देऊन काम करणारे ते कार्यकर्ते होते. आपली नोकरी सांभाळत त्यांनी चळवळीला वेळ दिला होता. त्यांचे अपघाती निधन झाल्याचे कळताच सर्वांना धक्का बसला. अतिशय शांत आणि मन मिळवू स्वभावाचे होते. दुसऱ्याला सढळ हाताने मदत करणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
त्यांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
त्याचा पुण्यानुमोदन व शोकसभा हा धार्मिक कार्यक्रम दिनांक १४ रोजी मुक्काम रामपूर बौद्धवाडी येथील बौद्ध विहारात सकाळी ११ वाजता होणार आहॆ. तरी सर्व मित्रपरिवार व अप्तेष्ठ सागेसोयरे यांनी त्यांना विनम्र अभिवादन व भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित रहावे.












