फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभी पत्रकार कुमार नाडकर्णी यांचा उचित सत्कार !
श्रीदेव राधाकृष्ण मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभी घटस्थापनेनंतर, गावचे आराध्य खेळीयाच्या प्रांगणात, वैश्य समाजातर्फे श्रीफळ, श्रीदेव राधाकृष्णाची प्रतिमा अन शाल पांघरून संयोजकांनी अवचित सत्कार केला. यावेळी आप्पा पारकर,प्रथमेश रेवडेकर, विनोद मोदी, ऋषी मसुरकर,बाळू बिडये ,बाळा वळंजु , गुणेश कोरगावकर, सिद्धेश पावसकर, राजेश पारकर, सुंदर पारकर, रामा पारकर आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते …
यावेळी या प्रसादाबद्दल निशब्द कुमार नाडकर्णी यांनी खेळीयाच्या प्रांगणात, त्याच्या साक्षीने,माझ्या सेवेचा- कार्याचा बालगोपाळांनी, आठवणीने केलेला गौरव सदैव लक्षात राहून, मला प्रेरणा देत राहील ..अशा भावना व्यक्त केल्या. आणि आभार मानले…












