निष्ठा आणि कठोर मेहनतीने आपण यश सहज मिळू शकतो– मनस्या फाले
अभिमानास्पद कारमगिरी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी संस्था– संजय आग्रे.
फोंडाघाट मध्ये मनष्याचे जल्लोषात स्वागत
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– दिल्ली येथील ऑल इंडिया सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग स्पर्धेत, महाराष्ट्राच्या वतीने सिंधुदुर्गातील न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची इयत्ता नववीतील एनसीसी कॅडेट, कुमारी मनस्या फाले हिने सुवर्णपदक मिळविल्यानंतर, तिचे फोंडाघाट मध्ये आगमन होताच घरी आनंद व्यक्त करण्यात आला. दुसऱ्या दिवशी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडून आणि त्यांच्या संलग्न विभागाकडून एसटी स्टँड ते हायस्कूल बाजारपेठ मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
उघड्या जीपमधून दिल्ली येथे मिळवलेले सुवर्णपदक आणि ट्रॉफीसह मनस्या, एनसीसी मार्गदर्शक शिक्षक आर्या भोगले व एम.डी.लाड ,अजिंक्य पोफळे, वडील निलेश इत्यादी सहभागी होते.तर गाडीच्या मागेपुढे एनसीसी कॅडेटस आणि शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयात ची मुले- मुलीनी,उत्साहात मनस्येच्या विजयाच्या घोषणांनी आणि ढोल – ताशाच्या गजरात बाजारपेठ दणाणून सोडली. एसटी स्टँड वरील आणि मुलांच्या हातातील अभिनंदनचे अन आणि स्वागताचे फलकामुळे प्रत्येक फोंडावासीयांना अभिमानास्पद वाटत होते …
एसटी स्टँडवरून राधाकृष्ण मंदिर कडे मिरवणूक येताच मनस्या, शिक्षक, संचालकांनी राधाकृष्ण, गणपतीचे दर्शन घेऊन, यशासाठी सांगणे केले. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त *”फोंडाघाटची शान | महाराष्ट्राचा अभिमान”* मनष्याचा श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज आणि बालगोपाळ मंडळातर्फे श्रीफळ,शाल, गुलाब पुष्प आणि राधाकृष्णाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ….
पेठेतून उदंड उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक हायस्कूल परिसरात पोहोचल्यानंतर, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल आणि महाविद्यालयाच्या तर्फे मनस्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.निष्ठा – अचूक लक्ष आणि कठोर परिश्रम घेतल्यास माझ्यासारखे यश मिळविणे कठीण नाही. असा अनुभव मित्र-मैत्रिणींसह, सुवर्णपदक शेअर करताना मनस्याने मनोगत व्यक्त केले.. प्रत्येक विभागात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक मुला- मुलींच्या मागे संस्था सदैव पाठीशी राहील .मी सुद्धा सहकार्य करीन. असे संचालक संजय आग्रे यांनी स्पष्ट करून, मनष्याचा गौरव केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी,संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य,शिक्षक वर्ग, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्साहात उपस्थित होत्या…













