लांजा (प्रतिनिधी) भारतीय वायुसेनेत निवड झालेल्या लांजा आगरवाडी येथील साहिल सरफरे याचा प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था लांजा तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला .
लांजा आगरवाडीचा सुपुत्र असलेल्या साहिल सरपरे याने अथक प्रयत्न, प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय वायुसेनेत तो रुजू झाला आहे .त्याच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल लांजा येथे आलेल्या साहिल सरफरे याचा प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
लांजा आगरवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रियदर्शनी पतसंस्थेचे संस्थापक महंमद रखांगी, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण तसेच संचालक अश्रफ रखांगी, दिनेश पटेल, संजय तेंडुलकर, सोहेल मापारी, नाझीम नेवरेकर,महिला संचालिका धनिता चव्हाण, संस्थेचे व्यवस्थापक सुनील शितोळे तसेच कर्मचारी दिलीप रहाटे, शुभम कनावजे, संतोष गुरव त्याचप्रमाणे सभासद मारुती शिंदे, समीर सावंत, बळवंत शिंदे, प्रथमेश यादव, बाबा चांदोरकर आदी उपस्थित होते .












