मालवण | प्रतिनिधी : श्रावण विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड श्रावण या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आडवली येथील अरविंद अंकुश साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीचे अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मालवणचे सहकारी अधिकारी (श्रेणी २) अजय हिर्लेकर यांनी कामकाज पाहिले.
संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. कमलाकांत कुबल यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
निवडणुकीच्या निमित्ताने संस्थेचे संचालक तथा शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत, प्रशांत परब, अरुण लाड, दुलाजी परब, विनोद कुबल, मंगेश यादव उपस्थित होते. संस्थेच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व संचालकांना विचारात घेऊन चांगल्या प्रकारे कामकाज करण्यासाठी प्रयत्नशील राहू. असा विश्वास तरी उपाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर उपाध्यक्ष अरविंद साटम यांनी व्यक्त केला.
आभार संस्था सचिव व्हि. बी. कदम यांनी केले.













