तुळस येथील शेतकऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचा इशारा…
वेंगुर्ले l प्रतिनिधी :गेले सहा, सात महिन्या पासून तुळस परिसरात बिबट्या वाघ, गवेरेडे आणि माकड यांच्या कडून शेती बागायती चे मोठे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी आपली अनुदानावर घेतलेली शेतीची अवजारे विकण्यास काढली आहेत. याचा विचार शासनाने करावा व तत्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा संघटनेच्या नेतृत्वाखाली व सर्व शेतक-यांना आक्रमक भुमिका घ्यावी लागेल असा इशारा आज तुळस परिसरातील शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी मठ येथील वनविभागाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
मठ येथील वनविभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटीवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्यासह प्रदीप सावंत, भालचंद्र राऊळ, गोविंद गोरे, गंगाराम शेळके, वसंत पांगम, रामचंद्र धरणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले सहा ते सात महिने तुळस हददीत बिबट्या वाघाने धुमाकूळ घातला असून गेल्या दोन महिन्यापूर्वी श्री. गंगाराम विठू शेळके, महेश चंद्रकांत बरागडे आणि लक्ष्मण चंद्रकांत बरागडे याच्या शेळया व आताच काही दिवसांपूर्वी चार ते पाच वर्षांचा गाईचा पाडा मारलेला असून या शेतक-याचे मोठया प्रमाणात याकालावधीत प्रचंड नुकसान झालेले आहे. याचा वनविभागांकडून पंचनामा ही झालेला आहे. परंतु या भागात सर्व परिसरातील शेतकरी गुरे चरावासाठी नेत असतात. त्यामुळे सर्व शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण असून याचा परिणाम गुरांना तर आहेच परंतु आजूबाजूच्या वाडीत सुध्दा घुसून मनुष्य हानी होऊ शकते. या करीता वन विभागाने याचा त्वरीत बंदोबस्त करावा. न पेक्षा या परिसरातील शेतकरी व पंचक्रोशीतील शेतक-यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. जर ज्या शेतक-यांनी शासनाच्या अनुदानातून (जनावरे) तसेच यत्रसामुग्री अवजारे घेऊन त्याचा उपयोग होत नसेल तर काय करायचे. एका बाजूने गव्या रेडयांचा धुमाकुळ त्यामुळे ब-याच शेतक-यांनी शेती बंद केलेली असून जर वन्य प्राण्यामुळे त्रास होत असेल तर शेतक-यांने शेळया व गुरे अनुदानाखाली घेऊन फक्त नुकसाना सोसायचे का? सर्व बाबींचा विचार व अनुदानाखाली शेतीसाठी घेतलेली सर्व ट्रॅक्टर, पॉवरटिलर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेती बंद होत असून यंत्र सामुग्री चा ही उपयोग काय? दिवसा ढवळया सुदधा वस्तीमध्ये बिबट्या वाघांचा संचार असतो. त्यामुळे भितीचे वातावरण असते. तरी वनविभागाने याबाबत ठोस कारवाई करावी, असे या निवेदनात नमूद केले आहे.













