रोटरी स्कूलने पटकावली 14 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य पदक
या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्येे *14 वर्षे मुले या वयोगटात ट्रॅडिशनल वैयक्तिक* या प्रकारामध्ये शाश्वत धुमाळ – सुवर्ण पदक, श्री दळवी – रौप्य पदक, श्लोक दळवी – कांस्य पदक, *आर्टिस्टिक वैयक्तिक* या प्रकारामध्ये स्पंदन धामणे – सुवर्ण पदक, *आर्टिस्टिक सांघिक* या प्रकारामध्ये स्पंदन धामणे – सुवर्ण पदक, शाश्वत धुमाळ – सुवर्ण पदक, *कलात्मक सांघिक* या प्रकारामध्ये श्री दळवी – सुवर्ण पदक, श्लोक दळवी – सुवर्ण पदक, 14 वर्ष मुली या वयोगटात *आर्टिस्टिक सांघिक* या प्रकारामध्ये श्रावणी दिवेकर – सुवर्ण पदक, इशदा भोसले – सुवर्ण पदक, *कलात्मक सांघिक* या प्रकारामध्ये श्रावणी दिवेकर – सुवर्ण पदक, इशदा भोसले – सुवर्ण पदक, 19 वर्षे मुली या वयोगटात *आर्टिस्टिक सांघिक* या प्रकारामध्ये अनुष्का म्हातले – सुवर्ण पदक, प्रांजल आंबेडे – सुवर्ण पदक, *कलात्मक सांघिक* या प्रकारामध्ये अनुष्का म्हातले – सुवर्ण पदक, प्रांजल अंबाडे – सुवर्ण पदक पटकावून यश संपादित केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व सुवर्णपदक विजेत्यांची दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी इचलकरंजी येथे होणार्या विभागीय योगासना स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व योगापटूंना योगा प्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे व सौ. शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











