रत्नागिरी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडघम सुरु झाली असून अध्यक्ष आणि सभापतिपदांचे आरक्षण लागू झाले आहे.
सोमवारी मंत्रालयात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील चार नगर परिषद व तीन नगरपंचायतींच्या सोडती जाहीर झाल्या असून जिल्ह्यात प्रमुख नगर पालिकांवर महिलाराज असणार आहे. रत्नागिरी, राजापूर, खेड या नगरपरिषद तर गुहागर, देवरुख, लांजा, मंडणगड या नगर पंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. दापोली नगर पंचायत आणि चिपळूणचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांच्या मानसुब्यांवर पाणी पडले आहे. शिंदे शिवसेनेचे वर्चस्व असले तरीही भारतीय जनता पक्ष स्पर्धेत आहे हेही निश्चित.
राजापूर नगर पालिकेतही सर्वसाधारण महिला पडल्याने याठिकाणी अनेक महिला उमेदवार तयारीत आहेत. खेड नगर परिषदेमध्येही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण पडले आहे. सर्वाधिक चुरस हि चिपळूणमध्ये पाहायला मिळणार असून ये नगर परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे, त्यामुळेच इच्छूकांची संख्या नक्की वाढणार आहे.
लांजा, देवरुख व मंडणगड, गुहागर या चारही नगर पंचायतींवर सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनेक इच्छूक हिरमुसले आहेत. याठिकाणी कोणत्या महिला पदाधिकार्यांनी महायुती व महाविकास आघाडी संधी देणार हे पहावे लागणार आहे. तर दापोली नगर पंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राहिले आहे.
त्यामुळे ९ नगराध्यक्षपदापैकी ७ ठिकाणी महिला राज पाहायला मिळणार आहे.











