मैदानी स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नेत्रदीपक यश

खेड (प्रतिनिधी) :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या मान्यतेने पावसाळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा तळे या ठिकाणी दोन दिवस आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील 30 शाळांनी सहभाग घेतला होता श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही बक्षिसांची लयलूट केली. खालील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. विघ्नेश शेलार उंच उडी प्रथम क्रमांक साहिल चिनकटे ८०० मीटर व 6000 हजार मीटर धावणे प्रथम क्रमांक.
धावणे अनुष्का बोर्डे 1500 मीटर प्रथम क्रमांक, श्रवण मोरे गोळा फेक प्रथम क्रमांक, संस्कार बुरटे 3000 मीटर धावणे प्रथम क्रमांक, समिता बैकर 1500 मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्राची मांडवकर 800 मीटर धावणे प्रथम क्रमांक, विवेक देवघरकर गोळा फेक प्रथम क्रमांक, आर्यन मोहन पवार 1500 मीटर धावणे तृतीय क्रमांक, ऋषभ बुरटे 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक, वरील सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. क्रीडा शिक्षक सत्यवान धोत्रे, शिवाजी लवटे, समीर यादव यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजेश बुटाला, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला व संचालक मंडळाच्या सदस्यांनी तसेच प्रभारी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.