बांद्यात रविवार १९ ऑक्टोबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धा 

बांदा l प्रतिनिधी :येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्यावतीने नरकचतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर वध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवार १९ ऑक्टोबर रोजी पिंपळेश्वर मंदिर जवळ ही स्पर्धा संपन्न होणार आहे.

 

स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये तर द्वितीय १० हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच बांदा मर्यादित स्पर्धेस प्रथम क्रमांक ४ हजार ४४३ रुपये व द्वितीय २ हजार २२२ रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

 

यावर्षी प्रेक्षकांसाठी दिवाळी स्पेशल लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रथम पारितोषिक रेफ्रिजरेटर, द्वितीय कूलर व तृतीय इलेक्ट्रिक गिझर ठेवण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणून स्टॅचू कलाकार प्रशांत सावंत हे जिवंत पुतळा साकारणार आहेत.

 

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आशीष सावंत (७०५८३२२७०६), गौरांग साळगावकर (७०५८५५९२१६) किंवा देवेश वारंग (७०५७५६८४८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.