देवधे मणचे शाळेत जागतिक अंडी दिन साजरा

लांजा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधे मणचे या शाळेत १० ऑक्टोबर हा जागतिक अंडी दिवस साजरा करण्यात आला.
पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती लांजाच्या वतीने गटविकास अधिकारी श्री गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पंचायत समिती लांजा चे पशुधन विकास अधिकारी डॉ. श्री शिरकर यांनी नियमित अंडी सेवन करण्याचे विविध फायदे समजावून सांगितले.तसेच संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले. गटविकास अधिकारी श्री गिरी यांनी बाजारातील अंड्याच्या तुलनेत गावठी अंडी सेवनाचे विविध फायदे सांगून पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात कोंबडी पालन व अंडी व्यवसायासाठी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पशुधन अधिकारी श्री वेळवणकर, पशुधन पर्यवेक्षक डॉ श्रीमती कांबळे , पशुधन सहायक राज मणचेकर, मांडवकर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. नंदकुमार पाटोळे यांनी आभार मानले. सुत्रसंचलन नानासाहेब गोरड यांनी केले.