करुळ येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर संपन्न 

गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांची प्रमुख उपस्थिती 

वैभववाडी l प्रतिनिधी :        मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत करुळ ग्रामपंचायत यांच्या वतीने आधार कार्ड नोंदणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन वैभववाडी पं. स. गटाविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी केले.

यावेळी करूळ सरपंच नरेंद्र कोलते, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, कक्ष अधिकारी संतोष टक्के, पोस्ट विभागाचे अधिकारी तिर्लोटकर, मुख्याध्यापक दीपक घाटगे, ग्रा.पं. सदस्य भास्कर सावंत, विलास गुरव, महेश कदम, संजय कदम, प्रकाश सावंत, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, पोस्टमन नंदकुमार कोलते, अशोक कोलते, सुरेश कोलते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात पाच वर्षांखालील मुलांची नवीन आधार कार्ड काढण्यात आली. तसेच आधारकार्ड मधील पत्ता बदलणे, नाव बदलणे, आडनाव बदलणे, वय बदलणे आदी बदल करण्यात आले. या शिबिराला पोस्ट ऑफिस च्या अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी गटविकास अधिकारी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला आज आधार लागते. त्यामुळे आपले आधार आपल्या जवळ असणे फार गरजेचे आहे. आधार कार्ड बरोबर फार्मर आयडी तसेच आयुष्यमान कार्ड देखील प्रत्येक ग्रामस्थांनी काढणे फार गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शशिकांत गुरव यांनी माणले.