चिपळूण विरेश्वर मंदिरात २१ दिवस संजय चितळे देणार संथा

 “विद्यार्थी आणि अन्य लोकांसाठी दिवाळी सुट्टीत एक छान उपक्रम”

चिपळूण (वार्ताहर) : ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण आणि संजय चितळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २४ ऑक्टरोबर कार्तिक शुध्द तृतीया ते गुरुवार दि. १३ नोव्हेंबर २०२५ कार्तिक कृष्ण नवमी असा सलग २१ दिवस रोज सायंकाळी ६.३० ते ७.१५ या वेळेत वीरेश्वर मंदिर चिपळूण येथे श्री रामरक्षा स्तोत्र आणि श्रीविष्णूसहत्स्रनाम यांची संथा संजय चितळे देणार आहेत.
प्रामुख्याने शालेय विद्यार्थी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, त्यांना ही स्तोत्रे म्हणता यावीत त्या योगे त्यांचे मन चांगल्या गोष्टीत रमेल आणि पाठांतरही होईल ही इच्छा आहे. हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. पालक मंडळीनी आपल्या मुलांना आवर्जून या साठी पाठवावे, असे आवाहन संजु चितळे आणि ब्राह्मण सहाय्यक संघ परिवार यांनी केले आहे. कोणत्याही वयातील व्यक्तींना यात सहभागी होता येईल. सहभागींची उपस्थिती नियमित आणि वेळेवर असावी.