राज्यातील शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्याचे पगार दिवाळी पूर्वी करा

वित्त प्रधान सचिव रिचा बागला यांचे कडे मागणी

गौरव पोंक्षे माखजन
महाराष्ट्र राज्यातील अनुदानित,अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांवर काम करणाऱ्या,व आश्रम शाळा,आणि सर्वच महाराष्ट्र राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार दीपावली पूर्वी करण्यात यावेत अशी मागणी करत आमदार ज.मो.अभ्यंकर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे,माजी आमदार यांनी राज्याच्या वित्त व लेखा कोषागार प्रधान सचिव रिचा बागला यांची भेट घेतली.
राज्यातील शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर चा पगार हा याचं महिन्यात २० ऑक्टोबर पर्यंत दिल्यास,शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल.त्यामुळे शासनाने हा निर्णय घ्यावा अशी मागणी प्रधान सचिव रिचा बागला यांच्या कडे करण्यात आली.
यावेळी रिचा बागला यांनी सकारात्ककता दर्शवत,हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवला जाईल असे सांगितले.मुख्यमंत्री महोदयानी तशी फाईल वर स्वाक्षरी केली व आदेशीत केले.तर हे शक्य होऊ शकते असे सांगितले
दिवाळी पूर्वी पगार व्हावा यासाठी अनेक संघटनांकडून मागणी केली जात आहे.