वेंगुर्ले l प्रतिनिधी :आज ओरोस येथे झालेल्या १७ वर्षाखालील भालाफेक स्पर्धेमध्ये श्री शिवाजी हायस्कूल तुळस या हायस्कूलच्या विद्यार्थी कु. वासुदेव संतोष तुळसकर याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
त्याची आता विभाग स्तरावर निवड झालेली आहे. याबद्दल वासुदेव तुळसकरचे आणि त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री घोडे पाटील सर , प्रेरणा देणारे मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर यांचे हायस्कूल तर्फे आणि गावातून अभिनंदन होत आहे.












