मुक्त रिक्षा परवाने बंद करण्याची केली मागणी
राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातिल रिक्षा चालक मालक संघटना यांच्या शिष्टयमंडळाने राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
सद्यस्थितीत जिल्ह्यातिल रिक्षा चालक मालक यांना प्रामुख्याने त्रासदायक असणारे रिक्षाचे मुक्त परवाना धोरण व त्यामुळे अडचणीत आलेला रिक्षा व्यावसाय यावर चर्चा करून अडचणीत आलेल्या रिक्षा चालक मालक यांना दिलासा देण्यासाठी मा.आमदार श्री किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक मालक संघटना रत्नागिरी जिल्हा शिष्टमंडळाने मुक्त परवाना रत्नागिरी जिल्ह्यात तात्काळ स्थगित करण्यात यावा अशी मागणी केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा.उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला संपर्क साधून मुक्त रिक्षा परवाना स्थगिती बाबतीत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मा.आमदार सदानंद चव्हाण, संजय कदम, रत्नदुर्ग रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष प्रताप भाटकर, राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटना सचिव संतोष सातोसे, रिक्षा संघटना चिपळूण अध्यक्ष दिलिप खेतले, संजय जोशी, प्रशांत गोरीवले, दिनेश भोजने, सदानंद गोंधळी, शुभम गोंधळी इत्यादी रिक्षा चालक मालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.













