16 वर्षाखालील मुलांची क्रिकेट निवड चाचणी 1 व 2 नोव्हेंबर रोजी

रत्नागिरी : 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निमंत्रित स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने 16 वर्षाखालील मुलांची क्रिकेट निवड चाचणी रत्नागिरी व चिपळूण येथे घेण्यात येणार आहे तरी ज्या खेळाडूंचा जन्म 1/9/2010 नंतर झाला आहे असेच खेळाडू या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतात.

शनिवार दिनांक 01/11/2025 रोजी रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख व संगमेश्वर येथील खेळाडूंनी कोळंबे मैदान, सोसा, रत्नागिरी येथे सकाळी 9.00 वाजता क्रिकेट निवड चाचणीसाठी हजर रहावे तसेच रविवार दिनांक 02/11/2025 रोजी चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड व दापोली येथील खेळाडूंनी पवन तलाव, चिपळूण येथील मैदानावर सकाळी 9.00 वाजता हजर रहावे. तसेच खेळाडूंनी सर्व क्रिकेट साहित्य व क्रिकेट गणवेश सहित हजर रहावे. असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, कार्यवाह  दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, सचिव बिपिन बंदरकर यांनी केले आहे.

या निवड चाचणी करिता येताना खेळाडूंनी 200 रुपये एपिलेशन फी, आधार कार्ड, जन्म दाखला सोबत घेऊन यायचे आहे. अधिक माहितीकरिता सहसचिव मनोहर गुरव 9890747525 व सहसचिव बलराम कोतवडेकर 9921003394 यांच्याशी संपर्क साधावा.