चिपळूण येथील जनता दरबारात प्रश्न सोडविण्याची दिली ग्वाही!
चिपळूण । प्रतिनिधी : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या चिपळूण येथील जनता दरबारात सर्वसामान्य नागरिकांनी आपली गाऱ्हाणी मांडल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा नेते यादव यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. चिपळूण येथे झालेल्या सहकार भवन मधे जनतेने आपली गाऱ्हाणी खा. राणे यांच्यासमोर मांडल्या.
याच दरम्यान काहीकाळ वीज खंडित झाली. मात्र याहीवेळी खा. राणे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकले आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.


















