उभादांडा येथे ‘दिवाळी विशेष कार्यशाळा’ विद्यार्थ्यांसाठी ठरली यादगार..

बॉटल पेंटिंग..कॅलिग्राफी सह विविध कलागुणांचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

तीन दिवसीय कार्यशाळा : ‘माझा वेंगुर्ला’ चे आयोजन

वेंगुर्ले l दाजी नाईक :व्यायाम, योगा, दगडावर चित्र रेखाटन, बॉटल पेंटिंग, संस्कृत बरोबर गंमत जंमत, जैवविविधता, झुंबा प्रशिक्षण, कॅलिग्राफी यासह विविध कलागुणांचा आस्वाद घेत तीन दिवसीय दिवाळी विशेष कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी यादगार ठरली. उभादांडा वेंगुर्ले येथे ‘माझा वेंगुर्ला’ तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभागी होत अनोखा आनंद अनुभवला.

मोबाईल च्या पलीकडेही जग आहे, आणि अनेक कलाकृती मधून, खेळातून आनंद मिळू शकतो. हे केवळ सांगून विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन दिवाळीच्या सुट्टी मध्ये ‘माझा वेंगुर्ला’ तर्फे आरोग्यधाम उभादांडा वेंगुर्ले येथे १० ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी माझा वेंगुर्ला चे सदस्य राजन गिरप, राजन गावडे, संदीप परब, अवधूत नाईक, शशांक मराठे, बोवलकर सर, जाधव सर, तावडे सर, सीमा मराठे, सुनील नांदोसकर आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ह्या कार्यशाळेत विविध विषयाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रार्थना अमृता पेडणेकर यांनी घेतली. व्यायाम व योगा याबाबत मारिया आल्मेडा यांनी माहिती दिली. कुंभारकाम आशिष कुंभार यांनी प्रात्यक्षिकासह दाखविले. विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आले. दगडावर चित्ररेखाटन गणेश कुंभार यांनी दाखविले. विद्यार्थ्यांनीही आपल्या परीने दगडावर चित्र रेखाटन करत प्रत्यक्ष सहभाग दर्शविला.

बॉटल पेंटिंग ही वेगळी कला मयूर पवार यांनी दाखविली. वापरात नसलेल्या काचेच्या बॉटलवर कसे पेंटिंग करता येते याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखविली. तर संस्कृतबरोबर गंमत जम्मत अनिल काळे यांनी करून दाखविली. दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गातील जैवविविधतेची ओळख प्रवीण सावंत यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. तर शिक्षक कर्पूरगौर जाधव यांनी जिगसॉ पज़ल बाबत मार्गदर्शन केले. नाचण्याचा कृतीतून झुंबा प्रशिक्षण शिवानी तुयेकर यांनी दिले. तर मुलांचे मानसशास्त्र या बाबत रिया सावंत यांनी, रचनास्पर्धा याबाबत खेमराज कुबल आणि कथाकथन वर मणेरीकर यांनी माहिती दिली.

प्रत्येक दिवशी या विद्यार्थ्यांना वेगवेगळा अनुभव अनुभवता आला. गाठ मारण्याचे प्रकार लांबर सर यांनी करून दाखविले. नारळांच्या झावळ्यांपासून विविध कलाकृती यामध्ये टोपी, साप अनिल परब यांनी सोप्या पद्धतीत करून विद्यार्थ्यांना या कलाकृतीकडे आकर्षित केले. तर कॅलिग्राफी सुनील नांदोसकर यांनी दाखविली. आवाजांची गम्मत सीमा मराठे यांनी सांगितली. बागकाम बाबत प्रथमेश घारे यांनी माहिती दिली. बेडकांबद्दल व अळंबीबद्दल माहिती मंगेश माणगावकर यांनी सांगितली. परबवाडा येथील जादूगार पूर्वा परब हिने जादूचे खेळ करून विद्यार्थ्यांना आश्चर्यचकित केले. कार्यक्रमाचे आयोजनात यासिरशहा मकानदार, खेमराज कुबल, श्रीती गायचोर, मयूर पवार, प्रथमेश घारे, शिवम वारंग, नीता आंगचेकर यांनी परिश्रम घेतले.

कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला संजय पुनाळेकर, सचिन वालावलकर, दादा साळगांवकर, रमेश नार्वेकर, अवधूत नाईक, राजन गिरप, राजन गावडे, प्रशांत आपटे, भरत मोबारकर, महेश वेंगुर्लेकर, अमोल खानोलकर, सुनील नांदोसकर, सीमा मराठे, तावडे सर व सर्व पालक उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली.